कार्यक्रमात दरम्यान स्टेज कोसळला, लालू यादव जखमी
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव शुक्रवारी थोडक्यात बचावले. पटनामधील दीघा येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लालू यादव पोहोचले होते. पण ते ज्या स्टेजवर उभे होते तो स्टेज अचानक कोसळला.
पटना : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव शुक्रवारी थोडक्यात बचावले. पटनामधील दीघा येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लालू यादव पोहोचले होते. पण ते ज्या स्टेजवर उभे होते तो स्टेज अचानक कोसळला.
मंचावर जेव्हा लोकांनी लालू यादवांना पाहिलं तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी लोकांनी स्टेजवर गर्दी केली. यामुळे स्टेजवर अधिक भार आल्याने स्टेज कोसळला. या घटनेत लालू यादव यांच्या कंबरेला मार लागला आहे. घटनेनंतर लालू यादवांना इंदिरा गांधी आयुर्विज्ञान रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव, मुलगी मीसा आणि पक्षाचे अनेक नेते यावेळी तेथे उपस्थित होते.
पाहा व्हिडिओ