नितिश सरकारकडून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी
बिहारमधील नितिश कुमार सरकारने आजपासून संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी केली आहे. संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य असणार आहे.
पाटणा : बिहारमधील नितिश कुमार सरकारने आजपासून संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी केली आहे. संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य असणार आहे.
बिहारमध्ये यापुढे हॉटेल आणि बारमध्ये मद्याची विक्री करता येणार नाही, तसेच मद्यविक्रीसाठी परवानाही दिला जाणार नाही, असे आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले. मात्र, लष्कराच्या उपहारगृहात मद्यविक्री सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी नितीश कुमार यांनी दारु बंदीवर मोठी मोहिम उघडणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. राज्याला मद्यविक्रीतून 2014-15 या आर्थिक वर्षात 3 हजार 700 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.