नवी दिल्ली : लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत बोलतांना मुलायम यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघर्ष कसा होता त्यापासून अखिलेश यादवांना शिकण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघा. ते गरीब कुटुंबातून आले आहेत. मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर ते आज पंतप्रधान झाले. ते त्यांच्या आईला नाही सोडू शकत.'


आपण आपल्यातील असलेल्या कमीविरोधात लढण्याऐवजी एक दुसऱ्यांसोबत लढत आहोत. मी परिवारात या वादामुळे खूप दु:खी आहे. असं देखील मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं आहे.