गुजरातमध्ये आता गोहत्या केल्यास होणार जन्मठेप
गोहत्या सुरक्षेसंदर्भात गुजरात विधानसभेने एक नवा कायदा पारीत केला आहे.
गांधीनगर : गोहत्या सुरक्षेसंदर्भात गुजरात विधानसभेने एक नवा कायदा पारीत केला आहे. या नव्या कायद्यानुसार आता गो हत्या करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप होणार आहे. तर गोमांस मिळाल्यास सात से दहा वर्षांची शिक्षा होणार आहे. गोमांस सोबत सापडल्यास १ लाख ते ५ लाखांचा दंड देखील होऊ शकतो.
आज राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जाडेजा यांनी गोवंश सुरक्षा कायद्यात बदल करत हे सुधारीत बिल राज्याच्या विधानसभेत सादर केलं. हा कायदा विरोधी पक्षाच्या गैरहजेरीत पास झाला. या नव्या कायद्यात पोलिसांना अनेक अधिकार देण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे पशू विकण्याचे आणि घेण्याचे लायसन्स आहे ते हे काम सकाळी ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच करु शकणार आहेत. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते तेव्हा गो रक्षा बिल पास केलं गेलं होतं.