नवी दिल्ली : सियाचीनमध्ये बर्फाखालून हणमंतप्पा यांना १५० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलं, याचा एक भलताच व्हिडीओ मंगळवारपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लोकांना असं वाटतंय की, ज्या जवानाला बाहेर काढण्यात येत आहे, ते हणमंतप्पाच आहेत, पण हा एक जुना व्हिडीओ आहे, जो हणमंतप्पा यांचा असल्याचं सांगून खपवलं जात आहे.


संरक्षण मंत्रालयाने लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. यात स्पष्ट शब्दात करण्यात आलं आहे की, सियाचीनमध्ये हणमंतप्पा ज्या घटनेत होते, त्याचा आणि या व्हिडीओचा काहीही संबंध नाही.


या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय, काही सैनिक आपल्या साथीदाराला बर्फातून बाहेर काढत आहेत. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे?, याची कोणतीही माहिती दिलेली नाही, काही अतिउत्साही लोकांनी हा सियाचीनमधील हणमंतप्पांना बाहेर काढण्याचा व्हिडीओ असल्याचं सांगून, सोशल मीडियावर वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.