नवी दिल्ली : देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत दाखल झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान अॅरोनॉटीकल्स लिमिटेडनं तयार केलेल्या या विमानाच्या स्कॉड्रनची पहिली दोन विमानं आज सेवेत सहभागी झालीत. मिग २१ या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेण्यासाठी तेजस तयार करण्यात आलंय. एका स्कॉड्रनमध्ये साधारणतः २० विमाने असतात.  त्यापैकी पहिली दोन विमानं आज स्कॉड्रनमध्ये दाखल झालीत. 


 वायूदलामध्ये समावेश होतांना " फ्लाईंग डॅगर्स 45 " अशी तेजसच्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल. तर 2018 च्या मध्ये तेजसचे पूर्ण स्क्वाड्रन सज्ज झालेले असेल.