मुंबई : सध्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. त्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र होत चाललेलय. मात्र यंदा जर पाऊस चांगला पडला तर आणखी व्याजदर कपात करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेत.


 गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलेय की, यंदा पाऊस चांगला झाला तर कर्ज स्वस्त होईल. आणि त्याचा लाभ गृहकर्ज, वाहनकर्ज घेणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे घरे, वाहने आणखी स्वस्तात उपलब्ध होतील असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिलेत. 


आणखी व्याजदर कपात शक्य


दरम्यान, आम्ही महागाईच्या दरावर लक्ष ठेवून आहोत. जर पाऊस चांगला पडला तर व्याजदर कपात शक्य होईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेच्या अधिकार्‍यांशी बैठकीसाठी राजन, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अमेरिकेत आहेत.