मुंबई :  केंद्र सरकारकडून जीएसटीतील सेवांपैकी काही गोष्टी करमुक्त करण्यात आल्या असून त्यात मुंबईकरांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटीतील नव्या कर रचनेनुसार मुंबईतील लोकल, मेट्रोच्या तिकीटांवर करमुक्त होणार आहे.  धार्मिक पर्यटनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तिकीटांवर करमुक्त करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम बांधवांच्या हज यात्रेचा प्रवासही करमुक्त करण्यात येणार आहे. 


त्यामुळे आता लोकलचे तिकीट आणि लोकलचा पास स्वस्त होणार आहे. तसेच घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान होणाऱ्या मेट्रो प्रवासाचे तिकीट दर आणि पासचे दरही कमी होतील. 


काल जीएसटीतील वस्तूंचे  दर जाहीर झाले आहेत. एकूण १२११ वस्तूंमधून सात वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय. यात धान्य आणि दुधाचा समावेश आहे.