पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात शिवसेना भाजपाला शह देण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे. मात्र याला यश येण्याऐवजी शिवसेना अधिकच संकटात पडताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील महिन्यात शिवसेना प्रमुखांनी गोव्यात झंझावाती दौरा केला. पण महिनाभरातच शिवसेनेतील असंतोष उफाळून आला आहे. ताम्हणकर यांना न विचारता अनुप जोशी यांची सहराज्य प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानं राज्य प्रमुखांसह अनेकजण सेनेला रामराम करण्याच्या विचारत आहेत. त्यामुळे गोव्यात भाजपला शह देण्यासाठी प्रयत्न करणारी शिवसेना स्वताच चांगल्या कार्यकर्त्यांना मुकणार आहे.