हल्दवानी : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांची चांगलीच गैरसोय झालीये. अनेकांनी तर जुन्या नोटा जाळून तसेच फेकून दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखडंच्या हल्दवानी येथील कटघरिया येथे चक्क 500, 1000च्या नोटा नाल्यात आढळल्या. यावेळी या नोटा मिळवण्यासाठी तेथील लोकांनी चांगलीच गर्दी केली. 


अनेकांनी नाल्यातील पाण्यात उतरत 500, 1000च्या जुन्या नोटा मिळवल्या. 8 नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान मोदींनी  500 आणि 1000च्या जुन्या नोटांवर बंदी घातली. त्यानंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा झालेत.