नवी दिल्ली : लोकसभा  आणि राज्यसभा कामकाजाला सुरुवातह होतात विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी शहिदांना श्रद्धांजली वाहण्याची मागणी केली. नागरोटा दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा राज्यसभेत मांडला. विरोधकांनी नागरोटा अतिरेकी हल्ल्याचा मुद्दा राज्यसभेत मांडला. यावेळी विरोधकांनी राज्यसभेत नोटाबंदी आणि अतिरेकी हल्ल्याप्रकरणी गोंधळ घातला. त्यानंतर १२ वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.


राज्यसभेत नोटाबंदी आणि अतिरेकी हल्ल्याप्रकरणी जेडीयु अध्यक्ष शरद यादव आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यात खडाजंगी रंगली. नोटाबंदीची चर्चा आधी आपल्या पक्षात करा अशी मार्मिक कोपरखळी अर्थमंत्री अरूण जेटली मारली. त्यानंतर राज्यसभेत गोंधळ निर्माण झाला. राज्यसभा कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्याआधी लोकसभेचे कामगाज  विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.