नवी दिल्ली : सर्वांत वेगवान मॅग्लेव्ह ट्रेन भारतात धावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  मॅग्लेव्ह ट्रेनसाठी भारतीय रेल्वेने काही विदेशी कंपन्यांना आमंत्रित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अद्यापपर्यंत सर्वांत वेगवान रेल्वे समजल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान अशा मॅग्लेव्ह तंत्रज्ञानावर आधरित मॅग्लेव्ह रेल्वे लवकरच भारतात धावणे शक्य आहे.


हा प्रकल्प खाजगी सार्वजनिक सहयोगातून आकारास येणार आहे. 


जपानमध्ये २४ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत मॅग्लेव्ह ट्रेनने ताशी ६०३ किमी एवढ्या वेगाचा विक्रम नोंदविला आहे. शांघाय ट्रेन म्हणून ओळखली जाणारी आणि सध्या जगात सर्वात वेगवान कमर्शियल मॅग्लेव्ह ट्रेन चीनमध्ये सुरू असून ताशी ४३१ किमी एवढा तिचा वेग आहे. 


ताशी किमान ३५० किमी एवढा वेग असणारी ही ट्रेन लवकरच भारतात रुळावर येऊ शकेल. अशा रेल्वे सध्या जपान, चीन आणि जर्मनीत धावत आहेत. या वेगवान रेल्वेगाड्यांसाठी चेन्नई-बंगलोर, नागपूर-मुंबई, हैदराबाद-चेन्नई व नवी दिल्ली-चंदिगड या मार्गांची निवड केली असल्याचे सांगण्यात आले.