नवी दिल्ली : महाराष्ट्रानं १० हजार ६८४ कोटी पॅकेजची केंद्राकडे मागणी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केलीय. १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी ७ हजार १०० कोटी आणि दुष्काळग्रस्त भागातील सिंचन योजनांसाठी साडे तीन हजार कोटी मागितलेत.

याबाबतचा सविस्तर योजनांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सादर केला. त्यामध्ये १०७ योजनांचा समावेश आहे. याचबरोबर जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली... आणि जलयुक्त शिवारमुळे आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार होतंय. 


त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात जास्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मागणी केली.