सर्वाधिक प्रलंबित खटल्यात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर
सर्वात जास्त खटले प्रलंबित असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत, महाराष्ट्र राज्य दुस-या क्रमांकावर आहे. देशभरात तब्बल तीन कोटी खटले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ही धक्कादायक माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयानं प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
नवी दिल्ली : सर्वात जास्त खटले प्रलंबित असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत, महाराष्ट्र राज्य दुस-या क्रमांकावर आहे. देशभरात तब्बल तीन कोटी खटले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ही धक्कादायक माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयानं प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
१ जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीत, देशातल्या सर्व जिल्हा न्यायालयांतल्या स्थितीचा आढावा घेतला गेला. त्यात विचार करायला लावणारी ही आकडेवारी समोर आली. सर्वाधिक प्रलंबित खटल्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. जलदगतीनं न्यायदान व्हावं याकरता, न्यायाधीशांच्या रिक्त जागा तातडीनं भरण्याची गरज या अहवालातून मांडण्यात आलीय. देशभरातल्या जिल्हा न्यायालयांमध्ये सध्या न्यायाधीशांची 5 हजार पदं रिक्त आहेत. येत्या काळात 15 हजार न्यायाधीशांची आवश्यकता भासणार असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.