नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळाला. लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या घोषणेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता.


चित्ररथात मंडाले तुरुंग, लोकमान्यांनी सुरु केलेल्या पहिल्या प्रिटींग प्रेसची प्रतिकृती दाखवण्यात आली होती. या शिवाय या चित्ररथासोबत लेझीम नृत्यही सादर करण्यात आली. त्याशिवाय मल्लखांबाचे प्रात्यक्षिकही सादर केली गेली. कलादिग्दर्शक चंद्रेशखर मोरे यांनीच यावेळी चित्ररथ साकारला आहे. दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता.