पणजी :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मगोपच्या दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा विधानसभेत भाजप आणि मगो युतीचे सरकार सत्तारुढ आहे. काही दिवस या युतीमध्ये विविध कारणांवरून संघर्ष सुरू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री झाल्यानंतर पार्सेकर यांना आम्हाला विश्वासात न घेताच मुख्यमंत्री केले, असा ढवळीकर बंधूंचा आक्षेप आहे. तसेच मुख्यमंत्री पार्सेकर कोणताही निर्णय घेताना विश्वासात घेत नाहीत, तसेच मगोला दुजाभावाची वागणूक देतात, असा जाहीर आरोप ढवळीकर बंधूंनी केला होता. 


दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं मुख्यमंत्र्यावर आरोप करत, त्यांना बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सुदीन आणि दीपक ढवळीकर या  मगोपच्या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे.यामुळे गेली साडेचार वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती आता तुटल्यात जमा आहे. पण भाजपवाले अजूनही युतीचा पोपट मेल्याचं जाहीर करण्यास तयार नाहीत.