सूरत  : महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई गांधी यांचं निधन झालं आहे. कनुभाई गांधी यांनी सूरतमध्ये रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. कनुभाई गांधी अधिक काळापासून गंभीररित्या आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनुभाई यांचा गांधीजीचं बोट पकडून मुंबईच्या किनाऱ्यांवरचा हा फोटो खूप प्रसिद्ध झाला होता. कनुभाई गांधी लहानपणापासून भारतात अनेक दिवस घालवल्यानंतप अमेरिकत गेले होते. तेथे त्यांनी वैज्ञानिक म्हणून काम केलं. सेवानिवृत्त झाल्यानंतर काही लोकांनी त्यांची पैशांची फसवणूक केली. त्यानंतर ते भारतात आले. त्यांना राहण्यासाठी येथे कोणतंही घर नव्हतं. त्यानंतर ते दक्षिण गुजरातमधील एका वृद्धाश्रमात राहत होते.


मीडियामध्ये त्यांची बातमी आल्यानंतर त्यांना अहमदाबादमधील गांधी आश्रमात आणलं गेलं. त्यांना अनेक राजकारण्यांनी येथे मदत देण्याचं आश्वासन दिलं. पण कोणीच मदत नाही केली. पैशाच्या अभावामुळे त्यांना व्यवस्थित उपचार देखील मिळाले नाहीत. अशी माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.