धोनीची आधारवरची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षी नाराज
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आधार माहिती सोशल मीडियावर लीक झाल्याने धोनीच्या पत्नी यामुळे नाराज झाली आहे. धोनीची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षीने केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ट्विट करत नाराजी दर्शवली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची आधार माहिती सोशल मीडियावर लीक झाल्याने धोनीच्या पत्नी यामुळे नाराज झाली आहे. धोनीची वैयक्तीक माहिती लीक झाल्याने साक्षीने केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे ट्विट करत नाराजी दर्शवली आहे.
साक्षीने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या 'आधार'च्या प्रमोशनवर धोनीची वैयक्तीक माहिती वापरल्याने नाराजी दर्शवली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगलवारी धोनीच्या आधार कार्डसोबत रजिस्ट्रेशन केलं आणि एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये धोनी आधार कार्डसाठी मशीनवर फिंगरप्रिंट स्कॅन करतांना दिसत आहे. रविशंकर यांनी ट्विट करत म्हटलं की, 'महान क्रिकेटर धोनीचा डिजिटल हुक शॉट.'