मानवी ढाल तयार करणाऱ्या मेजरचा सन्मान
लष्कराच्या पथकाला कोणतीही हिंसा न करता बाहेर काढण्यासाठी, एक शक्कल लढवण्यात आली.
नवी दिल्ली : लष्कराच्या पथकावर जमावाकडून जोरदार दगड फेक होत असताना, लष्कराच्या पथकाला कोणतीही हिंसा न करता बाहेर काढण्यासाठी, एक शक्कल लढवण्यात आली. दगडफेक करणाऱ्या एका काश्मीरी तरूणाला पकडून जीपच्या पुढील टायरवर बसवण्यात आलं, तो पळून जाऊ नये, म्हणून त्याला टायरवर बसवून बांधण्यात आलं.
ही जिवंत ढाल करण्यात आली. काश्मीरी तरूणाला बांधून ठेवल्याने भाड्याने दगडफेक करणारे दगडफेक करणारे नरमले, आणि लष्कराच्या पथकाने व्यवस्थित रस्ता काढत, मतदान पेट्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्या.
एका काश्मीरी तरुणाला भारतीय लष्कराच्या जीपला बांधून मानवी ढालीप्रमाणे वापर करणाऱ्या मेजर नितीन गोगाई यांचा भारतीय लष्कराकडून सन्मानित करण्यात आले. गोगाई यांना दहशतवादविरोधी कारवाईसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कॉमन्डेशन (COAS) ने सन्मानित करण्यात आले आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी लष्कराने उचललेल्या पावलामुळे किमान अनेकांचे प्राण वाचले होते. या वर्षी ९ एप्रिल रोजी झालेल्या पोट निवडणुकीदरम्यान सुमारे ५०० जणांचा जमावाने सुरक्षा दलाचे जवान आणि मतदान अधिकाऱ्यांना पोलिंग बूथवर घेरले होते.
स्थानिक काश्मिरी तरूणाला जीपला बांधल्याचे दृष्य व्हायरल झाल्यानंतर मेजर नितिन गोगाई चर्चेत आले होते. भारतीय लष्कराच्या या कृतीबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त करण्यात आली होती. मात्र, मेजर गोगई यांनी उचलेले हे पाऊल त्या परिस्थितीत योग्य असल्याचे समोर आले.
ज्या परिस्थितीत गोगई यांनी हा निर्णय घेतला त्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी गोळीबार करावा लागला असता. मात्र, गोगई यांनी तरुणाला जीपला बांधल्यामुळे जमावाने दगडफेक केली नाही आणि लष्कराचे पथक त्या भागातून जाण्यास यशस्वी ठरले.