पश्चिम बंगालमध्ये लष्कर तैनात, ममता बॅनर्जी भडकल्या
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात तैनात करण्यात आलेल्या लष्कराच्या तुकड्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात तैनात करण्यात आलेल्या लष्कराच्या तुकड्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात लष्करी बंडाची तयारी होतेय की काय अशी भीती वाटत असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
याच मुद्द्यावरून आज तृणमूल काँग्रेसनं हाच मुद्दा राज्यसभा आणि लोकसभेत सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण ममता बॅनर्जींचे सगळे दावे पोकळ असून लष्कर तैनात करण्यात आलेलं नाही असं सरकारनं म्हटलंय. लष्काराच्या सर्व हालचाली सामान्य असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी स्पष्ट केलं आहे.