झोपेतच `त्या`ने घेतला सापाचा चावा
सापाने माणसाचा चावा घेतल्याने माणूस जखमी झाल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. मात्र एका माणसाने सापाचे डोके चावल्याने तो जखमी झाल्याची घटना इंदोरमध्ये घडलीये.
इंदोर : सापाने माणसाचा चावा घेतल्याने माणूस जखमी झाल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. मात्र एका माणसाने सापाचे डोके चावल्याने तो जखमी झाल्याची घटना इंदोरमध्ये घडलीये.
विनोद रघुवंशी अस या व्यक्तीचे नाव आहे. विनोदला तोंड उघड ठेवून झोपण्याची सवय होती. यादरम्यान एक साप त्याच्या तोंडात गेला. झोपेतच विनोदने त्या सापाचा चावा घेतला.
विनोदला इतकी झोप लागली होती की त्याला आपण सापाचा चावा घेतला हे कळलेच नाही. जेव्हा त्याची आई घरात आली आणि त्याने विनोदच्या तोंडाला रक्त लागलेले पाहिले तेव्हा सारा प्रकार कळला. यात साप जखमी झाला.
विनोदला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, विनोदची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेय.