नवी दिल्ली : 9 हजार कोटींची कर्ज बुडवून परदेशी फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्याने लिहलेल्या पत्रावरुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता आहे. विजय माल्याने मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांना लिहिलेली पत्रे भाजपनं प्रसारमाध्यमांसमोर सादर केलीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्याने मनमोहन सिंग यांची भेट घेतल्याचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच मनमोहन सिंग यांनी केलेल्या सूचनेनुसार माल्या सिंग यांचे सल्लागार टी.के.ए. नायर यांना भेटल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलाय.


माल्या यांनी मनमोहन सिंग आणि चिदंबरम यांना प्रत्येकी दोन पत्र लिहिल्याचा दावा पात्रा यांनी केलाय. यातील एका पत्रामधून किंगफिशर एअरलाइन्सला मदत केल्यामुळे माल्याने मनमोहन सिंग यांचे आभार मानले होते असेही पात्रा यांनी म्हटलंय.