नवी दिल्ली : देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह २००७ साली  एका विमान अपघातातून थोडक्यात बचावले होते. रशियाच्या दौऱ्यावर ११ नोव्हेंबर २००७ रोजी  मनमोहन रवाना झाले होते, तेव्हा मॉस्कोमध्ये एअर इंडियाचं विमान लॅण्ड करताना क्रॅश होण्यापासून बालंबाल बचावलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडिया वनच्या विमान बोईंग 747नं लॅण्डिंगच्या वेळी आपलं लॅण्डिंग गिअर खाली केले नव्हते. त्यानंतर मॉस्को एटीसीनं ही बाब ध्यानात आणून दिल्यानंतर विमानाची चाकं उघडण्यात आली, असं  वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.


'व्हीव्हीआयपी विमान इलेक्ट्रॉनिक ग्लाइड स्लोपच्या खाली उड्डाण करत होतं. इलेक्ट्रॉनिक ग्लाइड स्लोप हा विमानाचा रस्ता असतो. हाच रस्ता पाहून विमान धावपट्टीवर उतरवलं जातं', असं विमानाच्या डेटा रेकॉर्डरने म्हटलंय.


'एफडीआर डेटाच्या मते, विमान फार कमी उंचीवर होतं. त्यामुळे ही फारच हैराण करणारी गोष्ट होती.' तसंच मॉस्को एटीसीचं म्हणणं आहे की, विमानाचे लॅण्डिंग गिअर खाली केलेले नव्हते. त्यानंतर कॉकपिटमध्ये एक अलार्मही वाजला होता', असं एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.