पणजी : गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात स्थापन झालेल्या नव्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन असून, आज विधानसभा सभापतींची निवड करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभापतीपदासाठी भाजपकडून डॉक्टर प्रमोद सावंत यांचं नाव सादर करण्यात आलंय. तर काँग्रेसकडून ऍलेक्स रेजिनाल्ड यांचं नाव सभापतीपदासाठी सुचवण्यात आलंय. 40 आमदारांच्या गोवा विधानसभेत सध्या भाजपकडे 22 विरुद्ध 16 असं  बहुमत असल्यानं, सभापतीपदी भाजपचे डॉक्टर प्रमोद सावंत यांची निवड निश्चित मानली जात आहे.


दरम्यान, उद्या राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि उपसभापतीपदाची निवडही करण्यात येईल. तर शुक्रवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, अर्थमंत्री या नात्यानं गोव्याचा अर्थसंकल्प सादर करतील.