नवी दिल्ली : गोव्यात भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यालयाने हा आदेश दिला. यावेळी काँग्रेसला जोरदार फटकारले. बहुमत असताना राज्यपालांकडे का गेला नाहीत, असा सवालही न्यायालयाने काँग्रेसला विचारला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचे समर्थक आमदार कुठे आहेत, आमदारांची यादी तुम्ही सादर केली होती का, असा काँग्रेसला सवाल सर्वोच्च न्यालयाने विचारला. काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी हा सवाल विचारला. 


गोवा विधानसभेत तातडीने विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तुमच्याकडे बहुमत होते तर सत्तास्थापनेसाठी दावा का केला नाही, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.


काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. आता आज संध्याकाळी मनोहर पर्रिकर यांचा शपथविधी सोहळा होणार की नाही याविषयी संभ्रम कायम आहे.


गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. ४० जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस १७ तर भाजपने १३ जागांवर विजय मिळवला होता. मात्र काँग्रेसमध्ये नेता निवडीवरुन वाद सुरु असतानाच भाजपने वेगाने चक्र फिरवून सत्तेस्थापनेसाठी मोर्चेबांधणी केली.


दरम्यान, गोव्यात मनोहर पर्रिकर शपथ घेण्याच्या तयारीत असतानाच भाजपने सावध भूमिका घेतली, मित्रपक्षांना या शपथविधीत स्थान देण्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती पर्रिकरांसोबत एकटे फ्रान्सिस डिसुझा शपथ घेणार आहेत.


तर दुसरीकडे राज्यपालांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे, असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला पहिले सत्तास्थापनेची संधी दिली पाहिजे, असे ते म्हणालेत.