पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 विरुद्ध 16 मतांनी पर्रिकारांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी विश्वजीत राणे मतदानावेळी गैरहजर राहिले.


मगोपचे तीन, गोवा फॉर्वर्ड पार्टीचे तीन, राष्ट्रवादीचा 1 आणि अपक्ष तीन अशा एकूण 10 आमदारांनी भाजपच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे पर्रिकारांचं बहुमत सिद्ध झालं.


आज कामकाज सुरू झाल्यावर आधी सर्व आमदारांना शपथ देण्यात आली. त्यानंतर मनोहर पर्रिकारांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिग्विजय सिंहांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.