मुंबई : राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सून अंदमानातही दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात उद्यापासून दोन ते तीन दिवसांच्या काळात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.


हवामानाच्या डायनॅमिक प्रकाराच्या प्रारूपांनी नोंदवलेली निरिक्षणं आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया यांवरून हा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्यावर्षी 18 मेला मान्सून अंदमानात दाखल झाला होता. यावर्षी दोन दिवस आधीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.