बिदर : मराठा मूक मोर्चाचे लोण शेजारच्या राज्यात पोहोचले आहे. सीमा भागातील कर्नाटकमधील बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीसाठी हा मोर्चात करण्यात आली. याशिवाय कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी १९ फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी, कर्नाटक सरकारने मराठी भाषेला अल्पसंख्यांक भाषेचा दर्जा द्यावा यासह इतरही अनेक मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. 


या मोर्चात महिला आणि विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. तर शेजारील लातूर जिल्ह्यातील अनेकांची उपस्थिती होती. दुसरीकडे चंद्रपुरातही आज मराठा समाजाच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या विराट मोर्चाला मोठ्या संख्येनं महिला, तरुणी आणि तरूणांनी उपस्थिती लावली.


सर्व आंदोलकांनी  शिस्तीचा आदर्श निर्माण करत शहरातून मूक रॅली काढली. शहरातल्या म्हाडा कॉलनी मैदानातून या मोर्चाला सुरूवात झाली. या आंदोलनाचा मार्गदर्शन केल्यानंतर समारोप शहरातल्या चांदा क्लब मैदानावर करण्यात आला.