मनसेला पुन्हा काटजूंनी डिवचले
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देण्यावरून पुन्हा भारतात वादंग सुरू आहे. यात आता निवृत्त न्यायाधिश आणि प्रेस कॉउन्सिलचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी उडी घेतली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देण्यावरून पुन्हा भारतात वादंग सुरू आहे. यात आता निवृत्त न्यायाधिश आणि प्रेस कॉउन्सिलचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी उडी घेतली आहे.
मनसेने पाकिस्तानी कलाकारांना मुंबईत काम करू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यावर मनसेला मार्कंडेय काटजू यांनी थेट आव्हान दिलं आहे. काटजू यांनी ट्विट करून म्हटले की मनसेचे लोक गुंडे असतील तर मी पण अलाहबादचा गुंडा आहे.
मनसेच्या गुंडांनी अरबी समुद्राचं खारट पाणी प्यायलं असेल तर मी पण अलाहबादचा गुंडा आहे. त्याने संगमाचं पाणी प्यायले आहे.
निराधार कलाकारांवर आपली मर्दुमकी दाखविण्यापेक्षा माझ्याशी दंगल करा असे खुले आव्हान काटजू यांनी मनसेला दिले आहे.