गुडगाव : मारुतीच्या मानेसर प्लान्टमध्ये झालेल्या हिंसा प्रकरणी शनिवारी 13 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 जुलै 2012 रोजी झालेल्या हिेंसेत मारुती सुझुकीचे एचआर मॅनेजर अवनीश कुमार देव यांना जिवंत जाळण्यात आलं होतं तर 40 हून अधिक अधिकारी जखमी झाले होते. 


अतिरिक्त जिल्हा तसंच सत्र न्यायाधीश आर. पी. गोयल यांच्या न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय. 13 जणांना जन्मठेप तर इतर चार आरोपींना पाच - पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. यातील अनेकांनी चार वर्षांपेक्षा जास्त तुरुंगात काढलेत. इतर 14 जणांना हिंसाचार प्रकरणी दंड आकारून सोडून देण्यात आलं. 


राम मेहर, संदीप ढिल्लों, रामविलास, सरबजीत सिंह, पवन कुमार, सोहन कुमार, प्रदीप कुमार, अजमेर सिंह, जिया लाल, अमरजीत कपूर, धनराज भांबी, योगेश कुमार और प्रदीप गुज्जर यांना जन्मठेपेची शिक्षा झालीय. त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगा, संपत्तीचं नुकसान आणि गैरवर्तनाचा आरोप होता.


या प्रकरणी पोलिसांनी मारुती सुझुकीच्या 148 कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यातील 62 आरोपी अजूनही फरार आहेत.