मारुतीच्या 75 हजार 417 कार माघारी
देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीवर खराब पार्टमुळे गाड्या परत मागवण्याची वेळ आलीये.
मुंबई : देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीवर खराब पार्टमुळे गाड्या परत मागवण्याची वेळ आलीये.
मारुतीच्या बलेनोची तब्बल 75 हजार 417 मॉडेल्स कंपनीनं परत मागवली आहेत. फॉल्टी एअर बॅग्स दुरुस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्यात.
दुसरीकडे मारुतीचं अत्यंत यशस्वी मॉडेल डिझायरची 1 हजार 961 मॉडेल्स खराब फ्युएल फिल्टर बदलण्यासाठी परत मागवलीयेत.