नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. महिलांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत आवाजी मतदानाने आज प्रसूती रजा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रजा भर पगारी असणार आहे. सुमारे १८ लाख महिला कर्मचाऱ्यांना या विधेयकामुळे लाभ मिळणार आहे.


मॅटरनिटी लिव्ह बिल म्हणजेच प्रसुती रजा सुधारित विधेयक याआधी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. महिलांना प्रसुतीसाठी आता २६ आठवडे प्रसुती रजा मिळणार आहे. प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली होती. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. 


सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता २६ आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे. यासंबधीचे सुधारित विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. कॅनडा आणि नॉर्वेनंतर महिला कर्मचाऱ्यांना इतकी मोठी प्रसूती रजा देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.