नवी दिल्ली : फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद होणार आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षांप्रमाणे आकाशात भरारी घेणं हे अवनी चतुर्वेदीचं वेड... तिचं लहानपणापासूनचं हे स्वप्न पूर्ण तर झालयंच पण तिची आता भारताच्या संरक्षणाच्या इतिहासातही नोंद होणार आहे. 
 
आत्ताच आम्ही खूप स्पेशल आहोत, असं काही आम्हाला वाटत नाहीय. आमचं लक्ष लागलंय ते ट्रेनिंगकडे... असं भावना हिनं म्हटलंय.


आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत हकेम्पेटमध्ये असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या बेसमध्ये या तीघी ट्रेनिंग घेत आहेत. ज्या पद्धतीची ट्रेनिंग पुरुष पायलटसना दिली जाते तिच ट्रेनिंग आपल्यालाही मिळत आहे... केवळ महिला आहोत, म्हणून कोणतीही सूट दिली जात नाहीय, असं मोहना सिंग हिनं म्हटंलय. 
 
याच वर्षांपासून नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रिकर यांच्या सरकारनं महिलांसाठी 'फायटर एअरक्राफ्ट'चं दार उघडं केलंय. या अगोदर १९९१ पासून इंडियन एअर फोर्समध्ये महिला पायलट हेलिकॉफ्टर आणि ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमध्ये दिसत आहेत.