श्रीनगर : मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात हा सोहळा पार पडला. राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहबूबा मुफ्ती यांनी पदाची शपथ घेताच जम्मू काश्मीरमध्ये नव्या इतिहासाची नोंद झालीय. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मेहबूबा मुफ्ती यांना मिळालाय तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे निर्मलकुमार सिंह विराजमान झालेत.


राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तसंच जितेंद्र सिंह उपस्थित होते.