कोझिको़ड: परप्रांतातून नोकरीच्या शोधात आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणाचं नशीब फळफळलं आहे. बंगालमधून केरळमध्ये आलेल्या मोफीजुल रहाना शेखला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोफीजुल हा पश्चिम बंगालच्या मालदामधून केरळमध्ये नोकरीच्या शोधात आला. त्यानं 4 मार्चला करुन्या लॉटरीचं 50 रुपयांचं तिकीट काढलं आणि त्याला आता 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.


ही लॉटरी लागल्यानंतर त्यानं लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस सुरक्षेची मागणी केली. त्याच्याबरोबर आलेल्या दुसऱ्या परप्रांतियांकडून मारहाण होईल म्हणून त्यानं ही सुरक्षा मागितली. 


यानंतर पोलीस त्याला घेऊन बँकेत गेले आणि त्याला बँक अकाऊंट उघडून दिलं, तसंच त्याचं लॉटरीचं तिकीटही सबमिट केलं.