पीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल
2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: 2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत. 2015-16 साठी पीएफवर 8.7 टक्के व्याजदराला अर्थमंत्रालयानं मंजुरी दिली आहे. कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली आहे.
पीएफ बाबत निर्णय घेणाऱ्या सीबीटीनं हे व्याजदर 8.8 टक्के असावेत असा प्रस्ताव दिला होता, पण अर्थखात्यानं हा प्रस्ताव मान्य केला नाही आणि 8.7 टक्के व्याज द्यायचा निर्णय घेतला. अर्थमंत्र्यांनी सीबीटीचा प्रस्ताव न मानण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2013-14 आणि 2014-15 मध्ये हेच व्याजदर 8.75 टक्के इतके होते, तर 2012-13 मध्ये 8.5 आणि 2011-12मध्ये 8.25 टक्के व्याज देण्यात आलं होतं.
2015-16 मध्ये 8.95 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं तरी 100 कोटींपेक्षा जास्त पैसे राहतील असा अंदाज इपीएफओनं सप्टेंबरमध्ये वर्तवला होता.