नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील वैशाली मेट्रो स्टेशनवरुन गायब झालेली स्नॅपडीलचे कर्मचारी इंजिनिअर दीप्ती सारना आपल्या घरी सुखरुप पोहोचली. मात्र, ती रिकाम्या हाती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 
दीप्तीच्या वडिलांनी मीडियाला माहिती देताना सांगितले, तिचा कॉईन बॉक्सवरून फोन आला. मी दिल्लीला येत नाही. मी म्हटले तू ये. मी तुला न्यायला येतो. तू कोठे आहेत? त्यावेळी ती म्हणाली मी ट्रेनमधून येते. मी म्हटले ठिक आहे. मी तिला घेऊन घरी आलोय. ती ठिक आहे. सध्या ती झोप घेत आहे. मी तिच्याशी काहीही बोललो नाही. ती उठल्यानंतर माहिती घेऊन मीडियाशी बोलू असे वडिलांना आश्वासन दिलेय.


दरम्यान, दीप्तीच्या वडिलांनी मीडियाचे, पोलिसांचे आभार मानले आहेत. माझी मुलगी सुखरुप घरी आलेय. मात्र, तिची बॅक आणि मोबाईल तिच्याकडे नव्हता. याबाबत मला काहीही माहिती नाही. दीप्तीशी नंतर बोलेन, असे वडिलांनी मीडियाला सांगितले.