नवी दिल्ली : कमला नगरमध्ये एका तरुणीकडे एका तरुणीने एक महत्त्वाचा फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. पण मोबाईल हातात येताच त्याने तेथून पळ काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणी एका चौकात उभी होती. तिच्याकडे एक कार येऊन उभी राहिली. त्या कारमध्ये एक तरुण आणि तरुणी होती. कारमधील तरुणीने तिच्या मोबाईलची बॅटरी संपल्याची बतावणी करुन दुसऱ्या तरुणीकडे एक फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. पण मोबाईल हातात येताच दोघांनी कारमधून पळ काढला.


याआधी ही अशा घटना या परिसरात घडल्या आहेत. अशा प्रकारे मदत करण्यासाठी जर तुम्ही तुमचा मोबाईल दिला तर तुमची देखील फसवणूक होऊ शकते. महागडे फोन वापरणाऱ्या लोकांना अशी टोळी ही टार्गेट करते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमधून फसवणूक होऊ नये म्हणून सावध राहण्याची गरज आहे.