नवी दिल्ली :  मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. मंगळवारी मोदी सरकारने शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या कर्जाचे व्याज माफ करण्यात आले आहे. अंदाजे एकूण ६६०.५० कोटी रूपयांचे व्याज माफ करण्यात आले आहे. 


ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकांकडून कमी कालावधीसाठी पीक कर्ज घेतले आहे. त्यांना फायदा होणार आहे. 


केंद्रीय कॅबिनेटने काही मोठ्या योजनांना मंजुरी दिल्या आहेत. यात आयआयएस बिलला पास करण्यात आले आहे. यात आता IIM डिप्लोमाच्या ऐवजी डिग्री देऊ शकणार आहे. 


केंद्राने एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाला ११.३५ एकर जमीन ट्रान्सफर करण्यात आली आहे.