किन्नोर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यावर्षी दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा केला. यंदा मोदींनी भारत-चीन सीमेचं रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन आणि लष्कराच्या डोगरा रेजिमेंटसोबत आपली दिवाळी साजरी केली. पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये जवानांशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्जिकल स्ट्राईकची कारवाई यशस्वीरित्या करणाऱ्या लष्कराचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित झोपू शकतो. समाजातल्या प्रत्येक घटकातल्या मान्यवरांनी त्यांची दिवाळी तुम्हाला समिर्पित केल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.  


गेल्या तीन वर्षात मोदींनी प्रत्येक दिवाळी सीमेवर लढणाऱ्या जवानांसोबत साजरी केलीय. 2014 मध्ये त्यांनी सियाचीनच्या जवानांचं धैर्य वाढवण्यासाठी जगातल्या या सर्वोच्च युद्ध भूमीवर दिवाळी साजरी केली. त्यानंतर गेल्यावर्षी पंजाबला लागून असणाऱ्या सीमेवर मोदींनी प्रकाशाचा उत्सव साजरा केला. आणि यंदा हिमाचल प्रदेशात चीनसीमेवर तैनात आयटीबीपी,लष्कर आणि डोगरा स्काऊटच्या बरोबर दिवाळी साजरी केली.