नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत आजही  काही घट झालेली नाही. आजही मोदी लोकांमध्ये तेवढेच लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण दुसरीकडे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केलेल्या काँग्रेसच्या बाजूने जनमतात वाढ होत आहे. 


प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत.  हा सर्वे मे महिन्यात करण्यात आला होता. याचे परिणाम सोमवारी जाहीर करण्यात आले. 


नरेंद्र मोदी 


१) ८१ टक्के भारतीय आजपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल चांगले मत आहे. ५७ टक्के भारतीय अजूनही पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक पसंद करतात.  २०१५ मध्ये ही संख्या ८७ टक्के होती. 


२) पंतप्रधान मोदी देशातील सर्व भागात आणि समुहांमध्ये लोकप्रिय आहेत. 


३) देशातील कारभारावर ६५ टक्के लोक खूश आहेत. तर ८० टक्के लोकांच्यामते अर्थव्यवस्था सुस्थितीत आहेत. २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेबाबत अशा प्रकारचे मत ठेवणारे ५५ टक्के लोक होते. 


४) काँग्रेसचे समर्थन करणाऱ्या २४ टक्के लोकांची मोदीबाबत सकारात्मक मत आहे. 


५) देशातील ग्रामीण आणि शहरी भागात मोदींचे समर्थक आहेत. 


६) मोदी असे व्यक्ती आहे की ते दुसऱ्यांचा विचार करतात, असे ५६ टक्के लोकांनी सांगितले आहे. 


७) ५१ टक्के लोकांच्या मते मोदी आम्ही जसा विचार करतो तसे ते वागतात. तर २८ टक्के लोकांनी असहमत आहेत. 


८) ५१ टक्के लोकांच्या मते पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टी योग्य ठेवण्याची योग्यता ठेवतात. ३३ टक्के लोकांच्या मते अनेक गोष्टी पूर्ण करू शकत नाही. 


९) ४९ टक्के लोकांच्या मते मोदी लोकांना जोडण्याचे काम करतात. तर २९ टक्के लोकांच्या मते ते विभाजनकारी आहेत


१०) बेरोजगारी दूर करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत असल्याबद्दल ६२ टक्के जनता सहमत आहे. 


११) ६८ टक्के भारतीयांच्या मते १० वर्षाच्या तुलने आज भारताची जगातील स्तरावर खूप महत्त्वाची भूमिका आहे. केवळ २२ टक्के लोक पाकिस्तानबद्दल मोदींनी दाखविलेल्या पुढाकाराचे समर्थन करतात. 


१२) २०१५मध्ये भाजपची लोकप्रियता ८७ टक्के होती ती आता कमी होत ८० टक्के झाली आहे. गुजरात, छत्तीसगड, आणि महाराष्ट्रात पक्षाच्या लोकप्रियतेत घट झाली आहेत. 


राहुल गांधी 


१) २०१४ नंतर काँग्रेसच उपाध्यक्ष राहुल गांधी यांची लोकप्रियतेत सुधारणा झाली आहे. 


२)  ६३ टक्के भारतीय राहुल गांधीबाबत चांगले मत ठेवतात.


३) ८५ टक्के काँग्रेस पक्षाचे समर्थक राहुल गांधीबद्दल चांगले मत ठेवतात. तर भाजप समर्थक ५२ टक्के लोक राहुल गांधी बाबत चांगले मत ठेवतात. 


४) ६५ टक्के भारतीय सोनिया गांधींना पसंद करतात. सोनिया गांधीबद्दल हे मत २०१५ मध्ये ५८ टक्के होते. तर २०१३ मध्ये ४९ टक्के होते. 


५) काँग्रेसच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे. २०१५ मध्ये ६१ टक्के रेटिंग होते त्यात सुधारणा झाली आहे. 


अरविंद केजरीवाल 


१) ५० टक्के भारतीय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंद करतात. त्यांची लोकप्रियता घटली आहे. २०१५ मध्ये ही टक्केवारी ६० टक्के होती. 


२) आम आदमी पक्षाच्या रेटिंगमध्ये घट झाली आहे. त्याचे समर्थकही कमी झाले आहेत. 


३) केवळ ४७ टक्के लोक पक्षाबद्दल चांगले मत ठेवतात. २०१५ मधये ५८ टक्के लोक होते.