नवी दिल्‍ली : नोटबंदीनंतर काळापैसा लपवण्याचा प्रयत्न करणारे आणि काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणारे लोकं पकडली जात आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांना सोडलं नाही जाणार. यातच एक अशी माहिती समोर आली आहे की, सरकारने ५०० बँकांमध्ये स्टिंग केलं आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास ४०० बँकांची स्‍टिंग सीडी अर्थ मंत्रालयाकडे पोहोचली आहे. स्टिंगमध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकांचा समावेश आहे. सीडीमध्ये बँक अधिकारी, पोलीस, दलाल यांनी एकत्र केलेली गडबड आणि नोट बदलल्याचे पुरावे आहेत. लवकरच याची चौकशी होणार आहे. पण फेब्रुवारीनंतर सुरु होईल. काही बँकांच्या अधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आल्याचं समजतंय.