या तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा
नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.
सरकार 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत भरण्याची तारखेत कोणतीच बदल केला नाही. म्हणजे 30 डिसेंबरपर्यंतच 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा काही करून बँकेत भरावे लागणार आहेत.
केंद्रीय राज्य अर्थमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, रिझर्व्ह ऑफ इंडिया आणि इतर बँकांकडे पुरेशे पैसे आहेत. तसेच 100 च्या नोटांच्या संख्येत देखील वाढ केली आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामीण बँकांमध्ये 100 आणि त्यापेक्षा कमी मूल्य असलेल्या नोटा पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरबीआय इतर बँकांना वेळोवेळी आपल्या शाखेचे आणि एटीएमच्या सुरक्षितेत वाढ करण्याचे तसेच एटीएम साइटच्या सीसीटीव्हीचे कवरेज आणि सिक्युरीटी स्टाफच्या ट्रेनिंग देण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्वीकरत असलेल्या बातम्यांचे खंडण केले.
आरबीआयने सांगितले की, 29 नोव्हेंबरनंतर जर आपण लीगल टेंडर वाल्या नोटा म्हणजे 10, 20, 50, 100 च्या ज्या नोटा पहिल्या पासूनच चलनात आहेत. आणि 500 आणि 2000 च्या नवीन नोटा बँकेत जमा केल्यास त्या नोटा कधीही कोणत्याही मर्यादेशिवाय काढू शकतो. ही मर्यादा फक्त नवीन नोटा जमा करणाऱ्यासाठी आहे. त्यामुळे 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा जमा करणाऱ्यासाठी याचा काही फायदा होणार नाही.