मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वादात सापडलेला सूट खरेदी करणारे लावजीभाई बादशहा हे देशातील १० हजार मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये दान करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱयावर आले त्यावेळी मोदींनी 13 लाख रुपयांचा सूट परिधान केला होता. यासूटवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे सोनेरी अक्षरांमध्ये नाव लिहिले होते. या सूटचा लिलाव करण्यात आला होता.


सूट खरेदी करणारे बादशहा हे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते की, 'सूरत येथे 13 मार्च रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी देशातून निवडलेल्या 10 हजार मुलींच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. 


बादशहा यांनी या आधी ही वेगवेगळ्या प्रकारे दान केले आहे. पाटीदार समाजात जन्मलेल्या 5 हजार मुलींच्या नावावर प्रत्येकी 2 लाख रुपये यांनी जमा केले आहेत. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना ते पैसे मिळणार आहेत.