नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर देशात चांगलाच हल्लाकल्लोळ झालाय. सर्वसामान्य जनतेसाठी जरी हा अचानक आलेला निर्णय असला तरी गेल्या १० महिन्यांपासून याबाबतची पाऊले उचलली जात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने काळ्या पैशाचे उच्चाटन करण्याच्या दृष्टाने १० महिने आधीपासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली होती. सरकारने सुरुवातीपासूनच ३०० कोटी रुपयांच्या नोटा छापण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सामान्य जनतेला अधिक त्रास सहन करावा लागणार नाही. दरम्यान या नोटा चलनात येण्यास काही कालावधी लागेल.


सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या देवास स्थित नोटप्रेसमध्ये ५०० रुपयांची छपाई आधीच सुरु झाली होती. दरम्यान, याबातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.