देशभक्ती मोजण्याचं कुठलही परिमाण उपलब्ध नाही - मोहन भागवत
कुणाची देशभक्ती मोजण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं विधान सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते भोपळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
भोपाळ : कुणाची देशभक्ती मोजण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं विधान सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते भोपळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
दुसऱ्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणं चूकीचं असल्याचं भागवत यावेळी म्हणाले.
भोपाळच्या भारत भवन इमारतीत विजय तिवारी यांनी लिहिलेल्या 'भारत की खोज, मेरे पंच साल' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी भागवतांनी ही विधानं केली.