पुणे : काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं आहे. श्रीनगरमधून नितीन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं. सकाळी बीएसएफच्या जवानांनी नितीन कोळींना आदरांजली वाहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिरंग्यात लपेटलेल्या नितीन कोळींच्या मृतदेहाला अखेरचा निरोप देताना बीएसएफ जवानांनी मातृभूमीचा जयजयकार केला. नितीन यांचं पार्थिव पुणे विमानतळावर आल्यानंतर आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातून पार्थिव त्यांच्या सांगलीतल्या मूळगावी दुधगावकडे रवाना झालं आहे. दुधगावमध्ये नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.