मथुरा : पती- पत्नीने एकमेकांकरिता प्राण त्याग केल्याचे आपण अनेक किस्से एकले असतील. सासू-सूनेचे नात्याबाबत काही वेगळे सांगायला नको. सासू-सूनेचे नाते हे मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणेच एखाद्या व्हिलनसारखे असते असे आपल्याला वाटते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अशी घटना तुम्ही आधी कधी ऐकलीच नसेल. सासू-सूनेच्याबाबत या प्रेमळ नात्याच्या प्रत्यय पहिल्यांदाच मथुरा येथे पाहायला मिळाला. कंपूघाट येथील ७० वर्षीय रहिवासी शीलादेवी या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. पार्श्वभागाचे हाड तुटल्यामुळे त्या कायम बेडवरच असत. अशा परिस्थितीत घरातील थोरली सून ममता अग्रवाल  सासूचे सगळं काही बघत होती.


एके दिवशी असेच सासूचे सगळे आटपून झाल्यावर दुपारी सासू-सून एकमेकींशी गप्पा मारत बसलेल्या. अचानक शीलादेवींची प्रकृती बिघडली. सूनेने त्यांना गंगाजल पाजले पण तोपर्यंत उशीर झालेला. शीलादेवींचे निधन झाले होते.


आपली सासू गेली हे पाहून ममता अस्वस्थ झाली. तिचे हातपाय कापू लागले. आणि अचानक तिचेही प्राण गेले. या सासू-सूनेचे एकत्र अंतिम संस्कार करण्यात आले. सासू-सूनेच्या या प्रेमळ नात्याची संपूर्ण गावभर चर्चा होत आहे