फेसबुक प्रेमीसाठी आईने केली मुलीची हत्या
एकाच फेसबुक फ्रेंडशी आई आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र ही गोष्ट आईला खटकल्याने तिने स्वत:च्याच मुलीची हत्या केली आणि पोलिसांसमोर आत्महत्येचा बनाव रचला.
चंदीगड : एकाच फेसबुक फ्रेंडशी आई आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र ही गोष्ट आईला खटकल्याने तिने स्वत:च्याच मुलीची हत्या केली आणि पोलिसांसमोर आत्महत्येचा बनाव रचला.
ही घटना आहे पंजाबच्या अबोहर भागातील. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मंजू आणि तिचा प्रियकर विजय कुमार उर्फ सोनू याला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीये.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिला मंजू आणि विजय यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. विजय डिसेंबरमध्ये सौदी अरेबियातून परतला. या नंतर दोघेही अबोहरमध्ये एकत्र राहू लागले. यादरम्यान विजयचे मंजूची मुलगी दीक्षा हिच्याशीही संबंध तयार झाले होते.
एके दिवशी मुलीने आपल्या आईला विजयसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर मंजू आणि तिच्या मुलीचे मोठे भांडण झाले. आपल्या प्रेमात मुलीचा अडसर नको म्हणून आईनेच मुलीच्या हत्येचा कट रचला. मात्र आपला गुन्हा लपवण्यासाठी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. अखेर तपासादरम्यान ही आत्महत्या नसून हत्या केल्याचे समोर आले.