मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी सलग आठव्या वर्षी आपलं वेतन 15 कोटींवर कायम ठेवलं आहे. तर दूसरीकडे कंपनी बोर्डाच्या सर्व एक्झीक्युटीव डायरेक्टरच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र स्वेच्छेने 2008-09 पासून त्यांनी आपलं वेतन 15 कोटी रुपयांवर कायम ठेवलं आहे. यापूर्वी त्यांचं वार्षिक वेतन 24 कोटी रुपये होतं. रिलायंस इंडस्ट्रीजच्या 2015-16 या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली.